अशी पाखरे येती
सन 2011 चा सुमार असेल, एक लॅब्रॅडोर जातीची कुत्री तू सांभाळशील का अशी
मला विचारणा झाली.. मूळ मालकाला सांभाळणे अ
रात्र झाली आणि
सवयीने तिने हॉलमधल्या सोफ्यावर उडी मारली. सोफ्यावर बसण्याचा अधिकार फक्त
माणसांचा, हा नवीन घरातला पहिला धडा तिला कळला आणि कोप-यातला गोणता हाच आपला सोफा
तिने स्विकारलाही.. रोजचं खाणं तिच्या देहाएवढंच, इवलुसं.... मॅक्सी स्वभावाला
अगदीच गरीब होती पण दादागिरी करायला जोडीदारीण छान मिळाली, हा मेलचा आनंद तिने
क्षणार्धात नेस्तनाबूत करुन टाकला. त्याच्या खाण्याच्या ताटलीत बिनदिक्कतपणे तोंड
घालून ती खाऊ लागली आणि तिचे खाणं संपेपर्यंत तो मुकाट उभा राहीला. मॅक्सीने पहिल्याच वेळी त्याचं जे पाणी जोखलं,
ते शेवटपर्यंत कायम राहीलं.. स्वत:चं खाणं घाईनं संपवून ती त्याच्या खाण्यावर
बिनधास्त डल्ला मारायची. त्याला तिची भिती होती असं नाही, कारण कित्येकदा तिला भूक
नसतानाही तिला भुंकून उठवल्याशिवाय आणि तिने खाल्ल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास
उतरायचा नाही. आजवर भाकरतुकडा खाणारी मरतुकडी मॅक्सी आमच्याकडे पेडीग्री खाऊ
लागली, छान बाळसं धरु लागली. पुढे पुढे तर दोघंही पायपुसणं दोन टोकांना धरुन
हिसकाहिसकी करायची.. ताकदीनं तिच्यापेक्षा दुप्पट असलेल्या मेलला ती पुरुन
उरायची. लुटुपुटीच्या भांडणातला त्याच्यावरचा तिचा गुरगुराट ऐकण्यासारखा असायचा.
दोघंही संसारात रुळली आणि एप्रिल महिन्याच्या एके रात्री तिला प्रसववेदना
सुरु खाल्या. तिच्या मूळच्या नाजूक तब्येतीमुळे जरा काळजी होती पण शेवटी मुक्या
जीवांचा देवच राखणकर्ता... रात्री अकरापासून अडीच वाजेपर्यंत एकामागोमाग चार
पिल्लं झाल्यानंतर तिने जी टाईमप्लिज घेतली ती सकाळपर्यंत. अजूनही पोटातली उर्वरीत पिल्लं हाताला लागत होती. कळा तर येत होत्या पण त्यांचा जन्म होत
नव्हता. अखेरीस कळा देऊन मॅक्सी थकली, अन एक पिल्लू मार्गातच अडल्याचं लक्षात आलं...
रत्नागिरीच्या डॉ. अविनाश भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे उपाय झाले पण पिल्लू
जागचं हलत नव्हतं. आता मात्र मॅक्सी जास्तच थकत चालली. तिला कळा देण्याचं पण त्राण उरलं नव्हतं.
डॉ.भागवत रत्नागिरीहून धावत आले.. अडलेले पिलू सोडवल्यानंतर आणखी चार पिल्लं
जन्माला आली आणि एकंदर 19 तासांचं नऊ पिल्लांचं बाळंतपण संपलं. जात्याच सोशिक
असलेली मॅक्सी सर्व पिल्लांना कुशीत घेऊन पहुडली होती. दिसामासांनी बाळसं धरलेली
सगळी पिल्लं प्रकृतीच्या बाबतीत मेलवर गेली.. एकदम दणकट.. योग्यवेळी चांगली स्थळ
पाहून सगळी आपापल्या घरी गेली. यानंतर दर हिवाळ्यात मॅक्सीची कूस उजवत राहीली आणि
तिने चार बाळंतपणात एकूण 32 पिल्लांना जन्म दिला.
”मॅक्सीची तब्ब्येत उत्तम राहायला हवी असेल तर आता बाळंतपण बास” हा
डॉ.भागवतांचा सल्ला मानून तिचा पाळणा थांबवला आणि त्यानंतर तिच्या अंगावर मूठ मूठ
मांस चढत गेलं.. वय वाढत चाललं होतं, बारीक सारीक कुरबुरी, स्कीन इन्फेक्शन यांना
तोंड द्यावं लागत होतं, तरीही ती आहे तशी खूष, आनंदी होती.
रोज बाहेरुन आम्ही घरी आलो की कितीही आजारपण असलं नसलं तरी मॅक्सी गेटपर्यंत
स्वागताला यायचीच. मे महिन्याच्या उन्हाळ्यात मेल आळस करायचा पण तापल्या
टाईल्सवरुन मॅक्सी पुढे यायची. दारावरुन जाणा-या येणा-यांना ही
जोडगोळी इतकी कौतुकाची होती की कोणीही हाक मारुनच पुढे जाणार. माझी कुसुमआत्या तर मेहूण
काय म्हणतंय असंच विचारायची. बहिणीची मुलं मे महिन्यात सुटीला आली की त्या
दोघांना फिरवायला न्यायचं कंत्राट त्यांच्याकडे असायचं.. त्यातही मॅक्सीला
फिरवायला सगळे खूष, कारण ताकदीची गरज नसायची आणि सोडून दिली तरी हाक मारल्यावर परत
फिरायची... त्यामानाने मेल दांडगोबा.. अंघोळीच्या वेळी पण तसंच... दोघांनाही मनापासून अंघोळ नको असायची पण चल
मॅक्सी अंघोळीला असं दरडावलं की बिचारी अपराध्यासारखी मान खाली घालून
बाथरुममधे उभी राहायची.
रोजच्या सलाईनमुळे
आता पायाच्या शिरा लागणं कठीण होऊन बसलं.. मागच्या पायाची शीर लागणं हे कसबाचं काम
आणि ती आउट न जाणं हे त्याहूनही महत्वाचं..
19 तारखेला महत्प्रयासाने मागच्या पायाच्या शीरेतून एक सलाईन पूर्ण झालं.
पण सकाळ झाली तीच निराशाजनक... आजवर लटपटत्या पावलांनी का होईना पण मॅक्सी बाहेर
येत होती, शू करत होती. किडन्या अजूनही काम करत होत्या. आज मात्र तिने अंथरुण
सोडलं नाही. उचलून बाहेर नेली तरीही तशीच बसून राहीली. निरुपायाने पुन्हा बेडवर
नेऊन ठेवली. खाणं केव्हाच सुटलं होतं. काल थोडं का होईना पाणी पीत होती. आज मात्र
मान फिरवत होती. ऑफीसमधून दुपारी घरी
आल्याआल्या पहिला प्रश्न, मॅक्सीने शू केली? उत्तर नकारार्थी मिळालं... बेड देखील
कोरडा होता म्हणजे किडनी फंक्शन ढासळू लागल्याची लक्षण.. जोपर्यंत लघवी होत नाही
तोपर्यंत सलाईन देणं अशक्य... देवाला हात जोडले.. डॉक्टरनी सांगितलेले लघवी
होण्याचं इन्जेक्शन दिलं आणि प्रतिक्षा सुरु झाली... पण ती शेवटपर्यंत प्रतिक्षाच
राहीली... रात्र झाली आणि स्थिती गंभीर बनली.. मॅक्सी कण्हत होती. तिच्या
बेडशेजारी बसून सर्वांगावरुन हात फिरवला की शांत रहायची पण उठून झोपायला गेलो की
कण्हायची. शेवटी एक वेदनाशामक इन्जेक्शन दिल्यावर तिला आराम पडला... तिच्याशेजारी
सुमारे साडेचारपर्यंत बसून होतो.. झोप लागल्ये बघून मी पण झोपायला गेलो..
घशातला आवंढा गिळून परसदारी तिचे क्रियाकर्म उरकले अन आत आलो. सवयीने तिच्या रोजच्या जागांकडे लक्ष गेलं. त्या रिकाम्या जागांनी काळजाला घरं पाडली. मेलला खाणं घालताना नेहमीप्रमाणे दोन भांडी उचलली गेली.. आता एकाच भांड्याची सवय करायला लागणार होती. अनुप कॉलेजला गेला होता तर नेहाचा पेपर असल्याने त्यांना कळवलेले नव्हते. संध्याकाळी ते दिव्य पार पाडायचे होते. स्वत:ला सांभाळू की त्यांना हेच कळत नव्हते. गेले पंधरा दिवस ऑफिसमधून लवकर येऊन तिचं स्पंजिंग, पावडर आणि मग औषधं, सलाईन हा क्रम म्हणजे एक रुटीन झालं होतं. आज संध्याक़ाळी घरी आल्यावर मात्र एक रितेपणा मनाला व्यापून राहीला...
दूरवर कोठेतरी गाणं लागलं होतं... अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती... अश्रूंचा बांध पुन्हा फुटला, मात्र तो थोपवण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती.
.
.
.
मनोज
21.06.2019


हृदयस्पर्शी.
ReplyDeleteपाखरे येतात आणि जातात,मनाच्या कोपऱ्यात आयुष्यभरासाठी कुठेतरी कायम स्वरूपी स्थान निर्माण करून....
ReplyDeleteया पाखरांना तुमच्या सारखे पालक मिळणे हे त्यांचे भाग्यच,
मॅक्सी ला आमच्या arrow च्या आई ला भावपूर्ण श्रद्धांजली
खूप ह्रिदय स्पर्शी लिहिलंय.. वाचताना अश्रू थांबवू शकत नाही तर तुमची काय अवस्था असेल समजू शकतो
ReplyDeleteखरी कुटुंब सदस्य होती तुझी ती ती गेली तेव्हा आम्हाला ही काही सुचल नव्हत कारण ती ओंकार कडे होती तेव्हा ओळखायला लागली होती .एखादा माणूस आणि एखादा लळा लावलेला जीव कायमचा नाहीसा होणं खुपच खोल घाव होण्यासारख असतं .
ReplyDeleteखरं आहे.. माझ्याकडे अधूनमधून येत असल्यामुळे मलाही तिचा लळा लागला होता. तुझ्या घरी आल्यावर तिच्याकडून खास स्वागत व्हायचं. लाड करून घ्यायची.. कुटुंबातला एक सदस्यच आपल्यात नसल्याची भावना मनात कायम आहे.
ReplyDeleteKhup chhan lihila ahe...
ReplyDeleteHeart touching
ReplyDelete